षड दर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांचा अभ्यास केला जातो. या दर्शनशास्त्रग्रंथांची अतिशय साधी आणि सोपी व्याख्या करून सर्वसामान्यांपर्यंत तत्वज्ञान पोहोचवण्याचे श्रेय सिद्धेश्वर स्वामींना जाते असे प्रकाश गिरिमल्लनवर यांनी सांगितले.
बेळगाव येथील डॉ. एफ. जी. हलकट्टी सभा भवन येथे आयोजित साप्ताहिक सामूहिक प्रार्थना व अनुभवगोष्टी कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश गिरिमल्लनवर पुढे म्हणाले की, हजारो वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली भारतीय दर्शने आजवर पंडितांच्या विवेचनामुळे समजण्यास कठीण होती. अशा कठीण आणि अनाकलनीय शास्त्रांच्या सिद्धेश्वर स्वामींनी केलेल्या पुनर्व्याख्या अतिशय सहज सोप्या आहेत. यावेळी त्यांच्या सिद्धेश्वर स्वामींच्या व्यापक साहित्याची सखोल माहिती देऊन नुकतेच सिद्धेश्वर श्रींचे समग्र साहित्य सहा खंडात प्रकाशित केल्यानिमित्त त्यांचा परिचय करून दिला.

दीपा गुडास यांनी अल्लमप्रभूदेवांचे निर्वचन केले. ए. पी. जीवनी यांनी प्रार्थनेचे नेतृत्व केले. लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा देयन्नवर, बसव सेनेचे अध्यक्ष शंकर गुडस, सदस्य संगमेश अरळी, महांतेश मेनसिनकाई, अरविंद परुशेट्टी, सारापुरे, थिगडी आदी उपस्थित होते.


Recent Comments