कडोली: येथील रामनगर गल्ली येथे सद्या राहाणारा तसेच सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये वाचमन,प्युन म्हणुन आणि बाहेर घर पेंटिंग काम करणारा व मूळचा बुगडीकट्टी ता.गडिंग्लज व जि.कोल्हापूर येथील बिराप्पा केंपाण्णा पुजेरी वय(४२) मध्यव्यसनामुळे कर्ज बाजारी झाल्यामुळे मानसिक दबावामुळे मंगळवारी मंगळवार दि.२८/०३/२३ रोजी रात्री अकरानंतर गायब झालेला आज शुक्रवार दि.३१/०३/२३ रोजी दुपारी एकच्या सुमारास अंबराईतील सरकारी कन्नड हायस्कूल जवळ गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघड झाल्याने लागलीच माजी महापौर यल्लाप्पा कुरबर

माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायाण्णा,माजी ग्राम पंचायत अध्यक्ष दत्ता सुतार,माजि ग्रा.पं.सदस्य गजानन कागणिकर,काकती पोलीस स्टेशनचे पि.एस.आय.चन्नबसप्पा सि.ए.,हवालदार विजय दोडमनी,हवालदार लथिप मुशापुरी व पत्नी कल्पना पुजारी आदींच्या उपस्थित पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी सिविल हास्पिटलला पाठवून दिल्यानंतर त्याच्या मुळगाव बुगडीकट्टी येथील स्मशानात अंत्यविधी करण्यात आले.
त्याच्या पश्चात पत्नी व एकुलता मुलगा आहे. १ माजि ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायाण्णा,माजी ग्रा.पं.अध्यक्ष दत्ता सुतार,माजी ग्रा.पं.सदस्य गजानन कागणिकर,काकती पोलीस स्टेशनचे पि.एस.आय.चन्नबसप्पा सि.ए.हवालदार विजय दोडमनी,हवालदार लथिफ मुशापुरी व पत्नी कल्पना पुजारी आदिंच्या उपस्थित पंचनामा करतांना.
२ मृत बिराप्पा पुजारी.


Recent Comments