Belagavi

सावगावमध्ये रात्री ऐकू येतो किंचाळण्याचा आवाज : गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Share

आधुनिकतेकडे पोचलेल्या या जगात, विज्ञानाने कितीही प्रगती केली तर अजूनही अंधश्रद्धा असल्याचे दाखले वारंवार मिळत आहेत . बेळगाव मधील सावगाव गावातील शेतवाडीतून ऐकू येणार्या आवाजामुळे गावात घबराट पसरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत . सोशल मीडियावरून देखील आवाजाचा ऑडिओ व्हायरल करून , याला खतपाणी घातले जात आहे . त्यामुळे गावातील ग्राम पंचायतीकडून , गावातील लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे . लवकरात लवकर हा आवाज कोणाचा हे शोधून काढले जाणार आहे .

बेळगाव मधील सावगाव हे कृषिप्रधान गाव .. मात्र या गावात गेल्या २ महिन्यांपासून रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत कसलातरी विचित्र आवाज ऐकू येतो असे गावातील काही लोकांचे म्हणे आहे तर काही लोक हा आवाज कुठल्यातरी प्राण्याचा असावा असे सांगत आहेत . सोशल मीडियावर या आवाजाचा ऑडिओ वायरल झाल्याने गावातील लोक आणखीनच घाबरून गेले आहेत . शिवाय वर्तमान पत्रातून देखील या आवाजाबद्दल बातम्या छापून आल्याने , सावगाव मधील या आवाजाबद्दल आणखीनच उत्सुकता वाढली आहे .

याची माहिती घेण्यासाठी आमचे इन न्युज चे प्रतिनिधी सुभानी मुल्ला यांनी सावगाव गावाला भेट देऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला .
गावातील , डॉ . यल्लाप्पा पाटील यांनी , संगतीवाले कि, आमच्या गावात १५ दिवसांपासून रात्रीचा आवाज येतो अशी लोकांची समजूत झाली आहे . आणि हे कर्णोपकर्णी जाऊन , अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत . काही दिवसांपूर्वी शेतातील ऊसतोड करण्यात आली आहे . त्यामुळे हा आवाज कोळ्याचा देखील असू शकतो . आम्ही गावकरी याचा शोध घेत आहोत . ग्राम पंचायतीच्या माध्यमातून आम्ही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत महिला आणि मुलांमध्ये हा आवाज भुताचा आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे . परंतु हा समाज खोटा आहे . आजच्या जगात भुतंखेतं असा प्रकार नाही . विज्ञान खूप पुढे गेले आहे . त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये . आणि ह्या आवाजाचा व्हिडीओ एडिट करून व्हरायल केला असावा . कोणीही असे प्रकार न करता गावाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले .

तर ग्राम पंचायत सदस्य कल्लाप्पा पाटील यांनी या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले . ग्राम पंचायतीच्या माध्यमांतून आम्ही लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करीत आहोत . ग्राम पंचायतीची बैठक घेतल्यानंतर आम्ही गावकऱ्यांची बैठक घेणार आहोत . यावर नक्की तोडगा काढू असे ते म्हणाले .

तर भूषण पाटील यांनी हा अंधश्रद्धेचा भाग असून ,कोणीतरी विनाकारण दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हा प्रकार केला असावा असे सांगितले . लोकांनी विनाकारण मनात भीती बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले . तर प्रियांका सुतार या तरुणीने , त्यांच्या शेतातून आवाज ऐकू येतो पण तो नक्की कोणाचा आहे याबद्दल संभ्रम असल्याचे सांगितले .

एकंदरीत सावगाव मध्ये रात्रीच्या वेळी ऐकू येणार्या आवाजाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत . मात्र गावकरी मात्र भीतीच्या छायेखाली वावरत आहेत . ह्या आवाजाचा शोध लागल्याशिवाय त्यांच्या मनातील भीती कमी होणार नाही असे वाटत आहे .

Tags: