भाजपचे संघटन मजबूत आहे आणि कार्यकर्ते दक्ष व तत्पर आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळण्याचा पूर्ण विश्वास आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
विविध मोर्चांच्या परिषदा, बूथस्तरीय विजय संकल्प यात्रा, राज्य व केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांची अधिवेशने, रथयात्रा असे अनेक उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येत्या निवडणुकीत भाजपसाठी असलेल्या तीव्र स्पर्धेबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, निवडणुकीत स्पर्धा असणे स्वाभाविक आहे . आमचा पक्ष , पक्षाचे नेते , तसेच हायकमांड यासाठी समर्थ आहेत . ही परिस्थिती हायकमांड प्रभावीपणे हाताळेल. हायकमांडकडून ज्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल. आसाम आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय नेते राज्याला भेट देणार आहेत.
बोम्मई म्हणाले की, काँग्रेस पक्ष सत्तेत येणार नसल्याने हमीपत्राचे वितरण केले जाणार आहे. हमीपत्र योजना ही जनतेची फसवणूक करण्याशिवाय दुसरे काही नाही. काँग्रेसला स्वतःचीच गॅरंटी नाही तर त्यांचे हमीपत्र घेऊन जनता काय करणार ? अशी टीका त्यांनी केली .
बेळगाव येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दूधभिषेक करण्यासाठी एमईएसला परवानगी देण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिल्ह्याचे एसपी आणि जिल्हाधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.
त्याचप्रमाणे , राहुल गांधी बेळगावला येत आहेत यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले कि त्यांना येऊ देत . शिवाय व्ही सोमाण्णा हे दिल्लीला अमित शाह यांना भेटून येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .


Recent Comments