तिलारी घाटात कोसळलेले वाहन काढण्यास गेलेली क्रेन कोसळल्याने मालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

तिलारी घाटात कोसळलेले वाहन काढण्यास बेळगावच्या आझादनगर येथील जावेद अत्तार यांची क्रेन मागवण्यात आली होती. त्यानुसार ते स्वतः आणि त्यांचा चालक अपघातस्थळी गेले होते. कोसळलेले वाहन काढण्याच्या प्रयत्नात क्रेनसुद्धा घाटात कोसळल्याने मालक जावेद अत्तार यांचा घटनेत मृत्यू झाला तर चालक जखमी झाला.

या घटनेबाबत आझादनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेबाबत जावेद अत्तार यांच्या भावाने चंदगड पोलिसात तक्रार केली असून चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments