राज्याने या जानेवारीअखेर महसूल वसुलीचे 91% उद्दिष्ट गाठले आहे. चालू अर्थसंकल्पातील 75 टक्के निधी या जानेवारीअखेर खर्च झाला आहे. लम्पि रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 कोटींहून अधिक गुरांचे लसीकरण केले आहे. गायींच्या पोषणासाठी पुण्यकोटी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. ही योजना लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य आहे. गोवंश संरक्षणासाठी गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सांगितले.
कर्नाटक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजप सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. 17 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज संयुक्त अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संबोधित केले.

राज्यपाल थावरचंद गेहलोत पुढे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेंतर्गत घरोघरी पाण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत ‘अध्यापन पुनर्रउजळणी’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. कल्याण कर्नाटकातील मुलांना अंडी, केळी आणि दूध वाटप करण्यात येत आहे. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. एससी, एसटी आणि बीपीएल कुटुंबांना मोफत वीज देण्यात आली आहे. समाज कल्याण योजनात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत बेळगावमध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सैनिक शाळा सुरू करण्यात आली आहे. बालविवाहाचे प्रमाण वाढलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात 200 हून अधिक ‘आमचे दवाखाने’ सुरू केले आहेत. चामराजनगरमध्ये विशेष रुग्णालयाच्या बांधकामासाठी पावले उचलली आहेत. चिक्कबळ्ळापूर आणि चिक्कमगळुरूसह अनेक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय रुग्णालये उघडण्यात आली आहेत.
2021-22 मध्ये परदेशी भांडवल गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने रोजगार धोरण आणले आहे. राज्यातील विमान वाहतूक विकासावर सरकार भर देत आहे. शिमोगा विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. विजापूर, हासन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रायचूर विमानतळ उभारणीचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगार आणि गरिबांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल गेहलोत यांनी आपल्या संबोधनातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. राज्यातील जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments