Belagavi

सद्गुरु वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे निधन; बेळगावात कार्यक्रम लांबणीवर

Share

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी व आपल्या मातृतुल्य सौ. शारदामाई यांचे आज दुपारी वयाच्या 97 व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी, प्रभूस्मरण बंगला, ओम सिद्धराज हाउसिंग सोसायटी, अभिनव नगरच्या पुढे, बोरीवली पूर्व येथे सायंकाळ पर्यंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सद्गुरू श्री.

वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांच्या देहावसानामुळे शनिवार दि.28 व 29 जानेवारी 2023 रोजी होणारा बेळगाव येथील नियोजित संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे निवेदन जीवन विद्या मिशनच्या बेळगाव शाखेतर्फे देण्यात आले आहे.

Tags: