नेत्यांना लाच देण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीला गेले आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केली.
बेळगावात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर निशाणा साधला. बोम्मई दिल्लीतील नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लोणी लावण्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. हे सरकार सहा महिने, सहा दिवसही टिकणार नाही, सर्व तालुक्यांमध्ये भाजपचे कार्यालय सुरू झाले पाहिजे, म्हणत दिल्लीतील नेत्यांना लाच देण्यासाठी गेले आहेत अशा शब्दांत हरिप्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.


Recent Comments