महाराष्ट्र विधिमंडळाने सीमाप्रश्नी केलेल्या ठरावाचा निषेध करत महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न निकाली निघालाय अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते सिद्धरामय्या यांनी दिली.
सुवर्णसौधमध्ये आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्दरामय्या म्हणाले की, महाजन आयोगाच्या अहवालानुसार सीमाप्रश्न या आधीच निकाली निघाला आहे. महाराष्ट्र सरकार सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याच्या मागणीचा ठराव करत असेल तर त्याला कायदेशीर वैधता नाही, आमच्या विधानसभेत आम्ही निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निर्णयाला कवडीची किंमत नाही अशी दर्पोक्ती सिद्दरामय्या यांनी केली.


Recent Comments