hubali

म्हादईवर बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : मुख्यमंत्री बोम्मई

Share

म्हादईवर बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही. म्हादईच्या पाण्याचा एक थेंबही कर्नाटकाला देणार नाही असे सोनिया गांधी गोव्यात म्हणाल्या. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यावर काँग्रेसने भिंत बांधली. म्हादई योजनेतील काँग्रेसचे हे योगदान आहे, असा टोला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लगावला.

हुबळी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भाजप सरकारने म्हादई योजनेसाठी अधिक काम केले आहे. मी पाटबंधारे मंत्री असताना झालेल्या आंदोलन काळात रक्ताने पत्र लिहिल्याने पाच किमीचा कालवा बांधला आहे. तेम्हादई प्रकल्पाबाबत बोलण्याची नैतिकता काँग्रेसवाल्यांना नाही.

आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना बोम्मई म्हणाले की, गृहमंत्र्यांनी दिल्लीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याची भूमिका स्पष्ट केली जाईल. सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

गरिबांना चांगली प्राथमिक सेवा देण्यासाठी मी धारवाड जिल्ह्यात आमच्या ७ क्लिनिकचे उद्घाटन करणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आमचे 100 दवाखाने राज्यभर सुरू होत आहेत. याला चालना देण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयात टेलिमेडिसिन, रक्त तपासणी आणि इतर चाचण्या उपलब्ध असतील अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली.

एकंदर, उत्तर कर्नाटकासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या म्हादई योजनेवर बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नसल्याची टीका बोम्मई यांनी यावेळी केली.

Tags: