जम्मू काश्मीर येथे लष्करात सेवा बाजवणाऱ्या बेळगावच्या पंतबाळेकुंद्री येथील जवानाचे हृदयविकाराने निधन झाले . आज त्याचे पार्थिव त्याच्या मूळगावी आणण्यात आले . आपल्या गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनतेसह राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मंडळींनी मोठी गर्दी केली होती . अमर रहे , अमर रहे, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या . साश्रूपूर्ण नयनांनी भारतमातेच्या या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला .

व्हॉइस ओव्हर : जम्मू काश्मीर येथे देशसेवेत रुजू आलेला , बेळगावच्या पंतबाळेकुंद्री येथील , मयूर के चंदनशिव या जवानाचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . गुरुवारी दिल्लीमार्गे गोव्याला त्याचे पार्थिव आणण्यात आले .त्यानंतर लष्कराच्या वाहनातून बेळगावला पार्थिव आणुन , पंतबाळेकुंद्री येथील पंतनगर येथे , नेण्यात आले . आपल्या गावाच्या सुपुत्राच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती . जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंतबाळेकुंद्री गावासह , सरकारी , राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मंडळी जमली होती . लष्करच्या सजवलेल्या वाहनातून, होंनीहाळ क्रॉसपासून अंत्ययात्रा काढण्यात आली .
यावेळी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले माजी सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष एम आय पाटील यांनी मयूर के चंदनशिव याने आपल्या ४२ वर्षांच्या जीवनकाळापैकी २३ वर्षे लष्करी सेवा बजावली . हवालदार पदी त्यांना बढती मिळाली होती . त्याच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत . लष्करी इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली . (बाईट )
यावेळी जवानाच्या कुटुंबीयांचा शोक अनावर झाला होता . उपस्थितांचे डोळेही पाणावले होते .


Recent Comments