Banglore

सीमाप्रश्नावर आमची भूमिका घटनात्मक : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

सीमावादावरील खटल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आले नसून याप्रश्नी कर्नाटकची भूमिका स्पष्ट व घटनात्मक असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
व्हॉईस : माजी मुख्यमंत्री केंगल हनुमंतय्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानसौध परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बोम्मई पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा अर्ज मेंटेनेबल (देखभालात्मक) नाही, अशी आमची भूमिका आहे. तसाच युक्तिवाद आमच्या वकिलांनी केला आहे. आमची भूमिका घटनात्मक आणि कायदेशीर आहे. सर्व मुद्यांवर आमचे वकील युक्तिवाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही पक्षात कोणत्याही रौडीशीटरला प्रवेश दिलेला नाही. कलंकित व्यक्तींना पक्षात घ्यायचे नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आमच्या या भूमिकेत बदल होण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.

वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मुस्लिम महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय उघडून तेथे त्यांना हिजाब घालण्याची परवानगी देण्याबाबत विधान केले आहे. या संदर्भात सरकारमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. ही आमच्या सरकारची भूमिका नाही. याबाबत वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सरकारशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.

याप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, खासदार मुनीस्वामी, केंगल हनुमंतय्या यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. एकंदर, सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्राने सुप्रीम कोर्टात दाखल केलेला दावा मेंटेनेबल नसल्याचा पुनरुच्चार बोम्मई याची पुन्हा एकदा केला आहे.

Tags: