पुरेशा बससेवेच्या मागणीसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बस रोखून धरल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील हलगणी गावात घडली.
शाळा-कॉलेज दरम्यान बसची सुविधा नसल्याने शाळा-कॉलेजला जाणे कठीण होत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. गावातील बसस्थानकाजवळ कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्टच्या बसेस थांबवून विद्यार्थ्यांनी निषेध केला. बसच्या समस्येबाबत अनेकवेळा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली,
मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी योग्य बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी योग्य आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Recent Comments