Belagavi

बसरीकट्टीच्या युवकाची विहिरीत आत्महत्या

Share

कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून बसरीकट्टीच्या युवकाने गावाशेजारील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

मिळालेली माहिती अशी आहे की लक्ष्मण दिलीप नागरोळी हा विवाहित युवक मंगळवारी सकाळी घरातून बाहेर गेला होता पण तो परत आलाच नाही .नाही गेल्या तीन दिवसापासून त्याची पत्नी व आई त्याचा शोध घेत होती पण गुरुवारी सकाळी स्वतः शेती करत असलेल्या शेत वाडीतील विहिरीमध्येच लक्ष्मण यांचा मृत्यू देह तरंगत असल्याचे पाहायला मिळाले ही माहिती बघता बघता सर्व गावभर पसरली . या घटनेची माहिती मारीहाळ पोलीस ठाण्याला देण्यात आली लागलीच पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली आणि लक्ष्मणचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला .

मंगळवारी सकाळी मुतगा येथील फायनान्स मध्ये काम करणाऱ्या एका युवकाने लक्ष्मण याची बाईक घेऊन गेल्याच्या मनस्तापाने ही घटना घडली असावी अशी चर्चा सर्वत्र होत होती, लक्ष्मण हा इतर व्यक्तीच्या कर्जाला जामीनदार म्हणून होता. कर्जदाराने वेळेत पैसे न भरल्याने जामीनदार म्हणून असलेल्या लक्ष्मण याला जबाबदार धरत फायनान्स मधील संबंधित कर्मचाऱ्याने त्याची बाईक घेऊन गेल्याचे समजते 32 वर्षीय लक्ष्मण दिलीप नागरोळी हा बसरीकटी येथील मारुती गल्ली चा रविवासी आहे. त्याच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षीय मुलगी व दोन लहान मुलगे असा परिवार आहे, या प्रकरणासंबंधी नेमके काय सत्य आहे याचा शोध मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत असल्याचे समजते

Tags:

basarikatti-youth-suicide/