: येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात पक्षांतराची लाट आली आहे. भाजपचे माजी आमदार यु. बी. बनकार समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. यावेळी सिद्दरामय्या यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
व्हॉईस : होय, कर्नाटक विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे जुळून येत आहेत. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराची लाट आली आहे. बेंगळूरमधील केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत हिरेकेरूर मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार यु. बी. बनकार यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेस राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील आदी ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते. यावेळी बनकार यांच्यासमवेत त्यांचे समर्थक मुंजन्ना,
शिवराज, हेमण्णा, षण्मुखय्या मळीमठ यांनीदेखील काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. फ्लो
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या ४०% कमिशनच्या भ्रष्ट राजवटीला राज्यातील जनता कंटाळली आहे. भाजपमधील प्रामाणिक नेत्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे त्यांचे नेते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेसला बहुमताने निवडून देऊन सरकार स्थाप्नेहची संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाईट
यावेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


Recent Comments