Belagavi

बहारदार शायऱ्यांनी जिंकले बेळगावकरांचे मन !

Share

बेळगावात उर्दू दिनानिमित्त आयोजित उर्दू कवींचे राष्ट्रीय स्तरावरील संमेलन ‘जश्न-ए-यौम-ए-उर्दू’ मुशायरा यशस्वीपणे पार पडला. यावेळी देशभरातून आलेल्या नामवंत शायरांनी एक से एक शायऱ्यांची पेशकश करून बेळगावकरांची मने जिंकली.

होय, बेळगावातील देसाई लॉन येथे शनिवारी सायंकाळी युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते ‘जश्न-ए-यौम-ए-उर्दू’ अर्थात उर्दू भाषेचा जल्लोष राष्ट्रीय उर्दू मुशायऱ्याचे उद्घाटन झाले. यावेळी मुफ्ती मंजूर आलम, सीकेएस नजीर, नगरसेवक अजीम पटवेगर, शकील मुल्ला, मुजमिल डोनी, रियाज किल्लेदार, अफजल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अबरार कासिप, जुबेर ताबी, शबिना अदीप, इरफान शानुरी, साकिब जुनेदी, अमानुल्ला निजामी, कमर एजाज, मुस्ताक अली घोहर, नदीम फारुक, नदीम सनदी, यासीन त्रासगर यासारख्या देशाच्या विविध भागांतील अनेक उर्दू शायरांनी यावेळी विविध विषयांवरील आपल्या शायरी सादर केल्या आणि बेळगावकरांची वाहवा मिळविली.
एकंदरीत बेळगाव येथे झालेल्या उर्दू कवींच्या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात बेळगाव शहर व तालुक्यातील विविध जिल्ह्यातील कवींनी येऊन आपल्या अप्रतिम शायरी पेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले.

Tags:

belgaum urdu mushayara