Belagavi

पहिले कदळी महिला संमेलन उत्साहात

Share

बाराव्या शतकातील वीरशैव पंथातील थोर स्त्री, अक्कमहादेवी यांचे जीवन संपूर्ण महिला समाजासाठी आदर्श असल्याचे मत गदग-डंबळचे डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय शरण साहित्य परिषद, कदळी महिला वेदिका जिल्हा युनिट, बेळगाव यांच्या वतीने गुरुवारी एस.जी बाळेकुंद्री तांत्रिक विद्यापीठाच्या सभागृहात श्रीमती पद्मावती अंगडी वेदिका, शरण रविदेवी-सुग्गलादेवी मंडप येथे बेळगाव जिल्ह्यातील पहिले कदळी महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय शरण साहित्य परिषदेचे मानद सल्लागार डॉ.गो.आर.चन्नाबसप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वामीजी आणि मान्यवरांनी विश्वगुरू बसवेश्वर आणि अक्कमहादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सुत्तूर येथील जगद्गुरु शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी आणि गदग-डंबळ येथील डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांच्यादिव्य सानिध्यात हे संमेलन पार पडले.

यावेळी तोंटद सिद्धाराम स्वामीजी यांनी कदळी या शब्दाविषयी माहिती दिली. कदळी हा भावनिक शब्द असून संत बसवेश्वरांनी या शब्दाचा वापर अनेक अर्थाने केला आहे. याचप्रमाणे अध्यात्मिक दृष्टिकोनातून या शब्दाचा अर्थ कशापद्धतीने वापरला जातो याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी अक्कमहादेवी यांनी कदळी या शब्दाचा कोणत्या अर्थाने वापर केला याबद्दलही त्यांनी विस्तृत माहिती दिली.

डॉ. तोंटद सिद्धाराम स्वामींनी अक्कमहादेवी यांच्या आदर्श जीवनाबद्दलही उपस्थितांना मार्गदर्शन केले. धार्मिक स्वातंत्र्य मिळवून मुलींनाही अध्यात्माची उंची गाठता येते असे सांगत अक्कमहादेवी या संपूर्ण महिला जगतासाठी आदर्श असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नीलगंगा चरंतीमठ यांनी रचलेल्या मुक्तांगणे या महाकाव्याचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कदळी वेदिका मानद अध्यक्षा राजेश्वरी कवटगीमठ या होत्या. याचप्रमाणे कदळीश्री पुरस्कार प्राप्त विद्या मगदूम, सुशीला सोमशेखर, कदळी वेदिका जिल्हाध्यक्षा प्रेमाक्का अंगडी, चन्नाप्पा नरसन्नवर, अशोक मळगली आदींचीही उपस्थिती होती.

Tags:

belgaum kadali mahila samavesh