माझ्या पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी माझे विधान मागे घेतले आहे. माझ्यासाठी पक्ष मोठा आहे, त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतल्याचे केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.
हिंदू शब्दाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर उमटलेल्या प्रतिक्रियांवर नाराजी व्यक्त करत सतीश जारकीहोळी यांनी कालच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. आज गुरुवारी बेळगावच्या काँग्रेस भवनात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी आणि काँग्रेस नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेत सतीश जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी जे बोललो ते वक्तव्य मागे घेण्यासाठी दबाव होता. वेगवेगळ्या कारणांसाठी दबाव होता. मी माझे विधान मागे घेतले आहे. मी काल सर्व नेत्यांशी चर्चा करून माझे विधान मागे घेतले आहे. खरा मुद्दा सोडून वेगळाच अर्थ काढत चर्चा सुरू झाली. व्यक्तिश: पक्षाचे नुकसान झाले. इतर नेत्यांनी त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. हा खासगी कार्यक्रम होता, पक्षाचा कार्यक्रम नव्हता, त्यामुळे सर्वांनी पाठिंबा देणे अपेक्षित नव्हते, परंतु काही लोक बोलले आहेत.
हे एवढ्यावरच थांबलेले नाही. स्वपक्ष, विरोधीपक्ष आणि प्रसारमाध्यमांसमोर काही मुद्दे स्पष्ट करतो, माझ्यासाठी पक्ष मोठा आहे, त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून मी ते वक्तव्य मागे घेतले आहे. माझ्यावर झालेल्या आरोपाची माहिती सर्वांना देण्याचे काम करत आहे. माझ्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी केली.
माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून निवेदन मागे घेतले आहे. दर तासाच्या हिहेबाने नुकसान सुरू झाले. त्यामुळे कालच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बाइट


Recent Comments