Belagavi

संकल्प सतीश पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Share

बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले खासबाग, बेळगाव येथील रहिवासी संकल्प सतीश पाटील यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत संकल्प पाटील हे बेळगाव येथील रिद्धी व्हिजनचे केबल ऑपरेटर आणि बसवेश्वर बँकेचे संचालक सतीश पाटील यांचा एकुलता एक मुलगा आहे. खासबाग येथील बाजार गल्ली येथील राहत्या घरी काल बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत संकल्पाचे आई-वडील राजस्थान दौऱ्यावर होते, त्यामुळे गुरुवारी सकाळी ते बेळगावला परतल्यानंतर खासबाग येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशातऱ्हेने अगदी तरुण वयातच एका युवकाचा अकाली मृत्यू झाल्याने आई-वडील आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अंत्यविधीच्या वेळी अनेक मान्यवर, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींनी हजेरी लावून संकल्प यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. संकल यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा आणि दोन काका असा परिवार आहे.

Tags:

satish patil funeral