केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात उमटायला सुरुवात झाली असून दरम्यान जारकीहोळींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले आहे.

व्हॉइस :निपाणी येथे ६ नोव्हेंबर रोजी मानव बंधुत्व वेदिकेच्या कार्यक्रमात हिंदू शब्दासंदर्भात केलेल्या विधानावरून तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली असून याप्रश्नी आज सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून आपण केलेल्या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास पथकाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे. शिवाय आपला हेतू कुणाच्या भावना दुखावण्याचा नसल्याचे सांगत आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.


Recent Comments