बेळगावातील बाजार गल्ली, खासबाग येथील रहिवासी संकल्प सतीश पाटील यांचे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिद्धी व्हिजनचे केबल ऑपरेटर सतीश पाटील यांचे ते पुत्र होत.

त्यांच्या मागे आई-वडील, आजी-आजोबा आणि दोन काका असा मोठा परिवार आहे. मृत संकल्पचे आई-वडील राजस्थानच्या दौऱ्यावर असून ते परतल्यानंतर अंत्यसंस्काराची स्पष्ट माहिती मिळणार आहे.


Recent Comments