बहुसंख्य हिंदूंच्या भावना दुखावणारे विधान करणारे सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या विधानावर कारवाई न करणाऱ्या काँग्रेसने पश्चाताप व्यक्त करून माफी मागितली नाही तर कर्नाटकमध्ये उरलेले थोडेसे अस्तित्वही काँग्रेसला गमवावे लागेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
उडुपी येथील हेलिपॅडवर आज प्रसारमाध्यमांसोबत बोलताना काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ शब्दाच्या व्याख्येबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी, सतीश जारकीहोळी हे नेहमीच देशातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करतात. अर्धवट वाचन आणि पूर्ण सखोल अभ्यास न करता केवळ मतांसाठी आणि अल्पसंख्याकांची मते येतील या भ्रमाखाली ते असे विधान करतात. ते भारतीय श्रद्धांचा पाया ढासळण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही देशात धार्मिक तेढ निर्माण करणे हे देशद्रोहाचे कृत्य आहे. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे असे सांगितले.
काँग्रेस पक्ष एकप्रकारे याला सहमत असल्यासारखे वागत आहे. छोट्या छोट्या मुद्द्यांवर आवाज उठवणारे राहुल गांधी आणि सिद्धरामय्या आज गप्प का आहेत? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर त्यांचे मौन म्हणजे यांना हे पटते का? हिंदूंच्या भावना दुखावल्या तरी काँग्रेस पक्ष बोलत नाही, याचा अर्थ काय? एवढे होऊनही सतीश जारकीहोळी आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत, हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. सतीश जारकीहोळी हे समाजात कीड सोडण्याचे काम करतात. त्यांनी आणि काँग्रेसने माफी मागून ताबडतोब पश्चात्ताप करावा. अन्यथा येत्या काळात त्यांचे तुटपुंजे अस्तित्वही नष्ट होईल असा इशारा बोम्मई यांनी दिला.
कर्नाटकात संपूर्ण जनतेने सतीश जारकीहोळी यांना कोपरा दाखवावा असे सांगत हे विधान पूर्वकल्पित आणि नियोजनबद्ध असल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments