भाजपची जनसंकल्प यात्रा अयशस्वी ठरली आहे. जनतेने भाजपला हटवून काँग्रेसलाच सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आज भाजपला टोला लगावला.
हुबळीमध्ये आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, जनसंकल्प यात्रेत लोक सहभागी होत नाहीत. आलेल्या लोकांनी जाऊ नये म्हणून भाजपने कार्यक्रमस्थळाच्या पुढच्या गेटना कुलपे लावून त्यांना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची टीका त्यांनी केली.
आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 10% आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मी अद्याप पाहिला नाही. मी पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देईन. माझ्या माहितीप्रमाणे, घटनेच्या कलम १५ आणि १६ अन्वये, आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी आरक्षणाची तरतूद नाही. संविधानानुसार आरक्षण केवळ सामाजिकदृष्ट्या मागास आणि अस्पृश्यता आणि विषमतापीडित आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समुदायांनाच दिले जाऊ शकते असा दावा त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सर्व प्रकारची तयारी करत असल्याचे सांगून सिद्धरामय्या म्हणाले की, सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाच्या व्याख्येबाबत केलेल्या विधानावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हुबळी येथील ईदगाह मैदानावर टिपू जयंती साजरी करण्याबाबत भाष्य करताना सिद्धरामय्या म्हणाले की, टिपू जयंती साजरी करणे चुकीचे नाही, परंतु सरकारने या उत्सवावर बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिका काय निर्णय घेते ते पाहू.


Recent Comments