बेळगावमधील शांताई वृदाश्रमातील रहिवासी विमला नारायण मुळगुंद यांच्या मरणोत्तर देहदानामुळे मृत्यूनंतरदेखील त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे.

: मूळच्या म्हैसूर येथील विमल मुळगुंद यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झालं. शांताई वृध्दाश्रमाचे संचालक अलेन विजय मोरे यांनी विमल मुळगुंद यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा देह बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हुबळी येथील गब्बूर क्रॉस नजीक असलेल्या के एल इ जगद्गुरू गंगाधर महास्वामी मुरुसावीर मठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी पाठविला आहे. प्राध्यापक आणि शरीर रचना विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णावर यांनी देहदानाची प्रक्रिया पार पाडली.
केएलईचे नूतन प्रकल्प अधिकारी डॉ.व्ही.डी.पाटील, प्राचार्य डॉ.एम.जी. हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, मारिया विजय मोरे, संतोष ममदापुर, वसंत बालीगा, डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुशीला देवी रामण्णावर यांनी देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचे आभार मानले.


Recent Comments