आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य करणे सुरु केले आहे. गोकाक मध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत आगामी निवडणुकीत राज्यात १५० जागांवर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केलाय.
विजापूरमधून सुरु केलेला प्रवास सध्या गोकाकच्या दिशेने वळाला आहे. गोकाकमध्ये झालेल्या जाहीर सभेत नलिनकुमार कटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढविला. आगामी विधानसभा निवडणुकीत १५० जागांवर भाजपाची सत्ता येईल. आणि सिध्दरामय्यांना राजकारणातून माघारी पाठविण्यात येईल, या दृष्टिकोनातून आपला प्रवास सुरु असल्याचे ते म्हणाले. राज्यात १५० आणि बेळगाव जिल्ह्यात रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली १८ जागांवर भाजपाची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने आर एस एस वर बंदीची मागणी केली आहे मात्र काँग्रेस स्वतःच एक दहशतवादी पक्ष असून काँग्रेसवरच बंदी आणली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांवर देखील नलिनकुमार कटील यांनी निशाणा साधत पैसे देऊन ते मुख्यमंत्रीपदी आले असा आरोपही केला. राज्यात सिध्दरामय्यांमुळे इंदिरा गांधी आणि काँग्रेस बदनाम झाले. सिद्धरामय्या हे राज्याचे पगारी मुख्यमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.
रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये १८ जागा भाजपच्या हाती येतील. पुढील निवडणुकीत काँग्रेसची एकाही जागेवर निवडून येणार नाही, प्रियांक खर्गे, सतीश जारकीहोळी यांच्यावरदेखील निशाणा साधत भाजपचा बेळगाववार अभूतपूर्व विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments