Politics

सिद्दरामय्या नरभक्षक; शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ढाळले नाहीत अश्रू : कटील

Share

गरिबांचा उद्धार करतो म्हणून गांधी, सिद्धरामय्या कुटुंब जगत आहे. पण गरिबांचा उद्धार काही झाला नाही. मात्र नरेंद्र मोदींनी फक्त गरिबांच्या खात्यात पैसे टाकले, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नलिनकुमार कटील यांनी विजापूर जिल्ह्यातील येथील नागठाण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले की, गांधी घराणे गरिबांच्या उद्धाराच्या नावाने जगते, तर सिद्धरामय्या कुटुंब गरिबांच्या उद्धाराच्या नावाने जगते. गरिबांच्या कल्याणाच्या नावाखाली खर्गे कुटुंब जगते. याच नावाखाली एम. बी. पाटील यांचे कुटुंब जगते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या खात्यात पैसे टाकले. मोदी सरकारने जनधन खात्यातून गरिबांना पैसे दिले आहेत. आयुष्मान भारत योजनेतून आरोग्य विमा, शेतकऱ्यांच्या खात्यात भरला. विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. तुम्ही कोणाच्या खात्यात पैसे टाकलेत, असा सवाल कटील यांनी काँग्रेस नेत्यांना केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नरभक्षक असल्याचा आरोप करून कटील म्हणाले, राज्यात सिद्धरामय्या यांच्या सत्ताकाळात 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण सिद्धरामय्या यांनी कधीच अश्रू ढाळले नाहीत. सिद्धरामय्या यांनी पीक भरपाई न दिल्याने बेळगावात विठ्ठल अरभावी या शेतकऱ्याने आत्महत्या केली, सिद्धरामय्या हे गाय मारणार्‍यांचे रक्षक होते. एसडीपीआय आणि पीएफआयच्या दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. हत्या सुरू झाल्या आहेत, त्याला कारण सिद्धरामय्या आहेत. त्यांनी यांनी या संघटनांच्या 2 हजार कार्यकर्त्यांना तुरुंगातून सोडले. म्हैसूरमधील आमदाराला त्यांनी भोसकले तेव्हा त्यांना अटक न केल्याचा आरोप त्यांनी केला.

Tags:

mb patil mb patil naleenkumar kathil naleenkumar kathil