गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे काल सायंकाळी रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला.

35 वर्षीय चन्नाप्पा अवप्पा निडसोशी हा युवक रेल्वेच्या धडकेत जागीच ठार झाले. मृत चन्नाप्पा हा मूकबधिर असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चन्नाप्पा बाजारात जाऊन बाजारात सामान खरेदी करून घरी परतत असताना घटप्रभा स्थानकातून मिरजेच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसची त्याला धडक बसली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी कळताच मृताच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments