भाऊ रमेश जारकीहोळी यांच्याकडे सरकार पाडण्याची ताकद आहे अशा शब्दांत आपले बंधू रमेश जारकीहोळी यांचे कौतुक करतानाच, ते पुन्हा सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील आपण सर्वांनी प्रार्थना करूया अशी चौफेर टोलेबाजी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली.
आमदार सतीश जारकीहोळी हे आज शनिवारी गोकाक शहरात आयोजित उप्पार समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रमेश जारकीहोळी यांनी मंत्री पद सोडले आहे. जारकीहोळी बंधूंमध्ये सरकार पाडण्याची ताकद असल्याचे म्हटले जाते. राज्याच्या राजकारणात आम्ही चार भाऊ आहोत. पण चौघे एकच आहेत असे समजू नका. चार भावांचे कामही वेगळे आहे, कोणीही गोंधळून जाऊ नये, असेही ते म्हणाले. आमच्याकडे फक्त रमेश जारकीहोळी आहेत जे सरकार पाडू शकतात. उर्वरित चार भाऊ सरकार पाडण्यात भाग घेणार नाहीत.
सरकार पाडण्याची ताकद फक्त रमेश जारकीहोळी यांच्यात आहे. ते पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न करतील अशी देवाकडे प्रार्थना करूया, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बाइट


Recent Comments