Banglore

सभागृहात आमदार ऐहोळे यांनी मांडला प्रस्ताव

Share

रायबागमधील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, तसेच कंकणवाडी परिसरात पोलीस उपकेंद्र सुरु करण्यात यावे अशा मागणीचा प्रस्ताव आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सभागृहात मांडला.

प्रश्नोत्तराच्या सत्रात आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सदर प्रस्ताव मांडला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गृहमंत्र्यांनी रायबागमध्ये येऊन अग्निशमन केंद्राचे उद्घाटन केले होते. उद्घाटनावेळी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती.

तसेच कंकणवाडी नगरपंचायत मुधोळ-निपाणी महामार्गावर असल्याने याठिकाणी बाह्य विभागाचे पोलीस ठाणे देण्यात यावे,

अशी विनंती कंकणवाडी शहरातील नागरिकांनी केली होती. याचा विचार करून दोन्ही मागण्या पूर्ण करण्याची विनंती आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी केली.

Tags:

POLITICS