Belagavi

दम असेल तर अभय पाटील यांच्यावर ईडी, आयटीचे छापे टाका : भास्कर राव

Share

अहंकारी राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारने 40% कमिशनच्या कारभाराने सीमा ओलांडून हैदराबादला जाऊन पोस्टर लावून मानमर्यादा घालवून घेतली अशी टीका आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष भास्कर राव यांनी केली.

बेळगावातील सरकारी विश्रामधामात मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर राव म्हणाले की, सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. मुख्यमंत्री असहायपणे आम्ही हे केले नाही असे म्हणतात. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सभापतींच्या पुढे नेल्यावर तो फेटाळून लावण्यात आला आहे. सरकार भ्रष्ट आमदाराच्या बाजूने उभे राहते हे दुर्दैवी आहे. अशा भ्रष्ट आमदाराला सरकारने पाठीशी घालणे चुकीचे आहे. केंद्र सरकार दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर ईडी आणि आयटी छापे टाकून सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना भास्कर राव यांनी, खऱ्या अर्थाने सरकारला भ्रष्टाचार संपवायचा असेल तर केवळ विरोधी पक्षावर छापे टाकण्याऐवजी सरकारमध्ये ताकद असेल तर ईडी आणि आयटी करवी बेळगाव दक्षिण मतदारसंघाच्या आमदारांवर छापे टाकून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. बेळगाव साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांची वजनाने फसवणूक केल्याची आणि पैसे न दिल्याची अनेक प्रकरणे आहेत.

संधी मिळाल्यास 3,500 प्रति टन. ते देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सातत्याने ऊस उत्पादकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. आम आदमीच्या एकही नेत्याचा साखर कारखाना नाही. काँग्रेस, जेडीएस आणि भाजप सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

उत्तर कर्नाटकच्या समस्येवर प्रकाश टाकण्याची इच्छाशक्ती इथल्या आमदारांमध्ये नाही. ते बंगलोरला येऊन मौजमजा करत आहेत. या भागातील आमदार बंगळुरूला गेले तर त्यांच्यावर एकप्रकारे जादूटोणा केला जातो का अशी शंका येते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी हजारो कोटींची लूट केली, मात्र दावा केल्याप्रमाणे विकास झाला नाही. सर्वत्र ठेकेदार आणि आमदारांच्या भल्यासाठी कामांची आखणी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आम आदमीचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपन्नावर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षातून आम्ही लढत आहोत. अधिकारी योग्य माहिती देत ​​नाहीत. स्मार्ट सिटीत कामाचा दर्जा निकृष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी याची सीबीआयमार्फत चौकशी करावी. बेळगावचे दोन आमदार आणि खासदार यात सहभागी आहेत. याची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेला विजय शास्त्रीमठ, शंकर हेगडे, संपतकुमार, रवींद्र बेल्लद आदी उपस्थित होते.

Tags:

POLITICS