Banglore

चंद्रशेखर स्वामीजी, आ. ऐहोळे यांनी घेतली मामनी यांची भेट

Share

 

 

 

 

 

 

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलला भेट देऊन कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात उपचार घेत असलेले विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांची रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे आणि हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आनंद मामनी यांना स्वामीजींनी विभूती लावली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले, आनंद मामनी हे त्यांच्या वडिलांप्रमाणे समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांचे वडीलही उपसभापती होते. आनंद यांनीही उपसभापती म्हणून लोकप्रियता मिळवली असून त्यांची तब्येत चांगली आहे, घाबरण्याची गरज नाही, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा असे सांगत त्यांनी लोकांना धीर दिला.

 

यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सौंदत्ती मतदारसंघातील जनतेला धीर दिला आणि सांगितले की आनंद मामनी हे आमचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. ते लवकरच रुग्णालयातून बरे होऊन मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी परत येणार आहेत.

 

यावेळी आनंद मामनी यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.

Tags:

POLITICS