Bagalkot

एफडीएची नोकरी देण्याच्या आमिषाने महिला पीएसआयकडून फसवणूक !

Share

राज्यात सरकारी नोकर भरतीचे दररोज नवनवे घोटाळे उघडकीस येत आहेत. आता 2020 मध्ये झालेल्या केपीएससी परीक्षेत डील झाल्याचा एक ऑडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या ऑडिओमध्ये पीएसआयनेच डीलबाबत बोलून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता फसवणूक होऊन नोकरी न मिळाल्याने हे डील प्रकरण समोर आले आहे. याबाबत पहा हा संपूर्ण वृत्तांत …

 

होय, राज्यात एकामागून एक सरकारी नोकर भरती परीक्षा घोटाळे उघडकीस येत आहेत. आता 2020 मध्ये झालेल्या केपीएससी परीक्षासंबंधी सरकारी नोकरीची ऑफर दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. पीएसआय भरती घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच केपीएससीने घेतलेल्या परीक्षेत एका महिला पीएसआयने एका उमेदवाराला प्रथम सहाय्यक दर्जाचे (एफडीए) पद देण्याचे आमिष दाखवून नातेवाईकाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

 

ती पीएसआय मूळची बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील चिक्कळकी गावची अश्विनी अनंतपूर आहे. सध्या म्हैसूर जिल्ह्यातील एनआर पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक विभागात सेवा बजावते. तिच्यावर एफडीएचे पद मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणूक झालेला तरुण संगमेश झळकी हा पीएसआय अश्विनीचा नातलग आहे.
केपीएससीने मार्च 2020 मध्ये एफडीए पदासाठी अर्ज मागवले होते. याच पीएसआय अश्विनी यांनी त्यांचे नातेवाईक संगमेशचा भाऊ बसवराज यांना अर्ज करण्यास सांगितले होते. ओळखीच्या व्यक्तीने पदाची ऑफर देण्यापूर्वी 2 लाख आणि नोकरी मिळाल्यानंतर 15 लाख द्या, असे सांगितले. संगमेशचा भाऊ बसवराज हा बेरोजगार होता, त्याला नोकरी करायची होती आणि आधी 2.10 लाख रुपये दिले. पीएसआय अश्विनी यांच्या खात्यात पैसे जमा झाले.

 

आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर, पीएसआय अश्विनीने एफडीए परीक्षेला बसताना काय करायचे हे देखील स्पष्ट केले. पीएसआय अश्विनी हिने फसवणूक झालेल्या संगमेशचा भाऊ बसवराज याला सांगितले की, तुला येणारी उत्तरे लिहून बाकीचे रिकामे ठेवू आणि नंतर ओएमआर शीट भरून परीक्षा पास करून घेऊ व नोकरी मिळवून देऊ. बसवराज यांनी त्यानुसार काम केले. नंतर परीक्षेचा निकाल लागल्यावर मात्र यादीत त्याचे नाव नव्हते, संगमेश यांनी याबाबत पीएसआय अश्विनी अनंतपुरे यांना फोन केला असता, तिने तुम्ही कोण आहात, असे विचारले असता त्यांनी फोन ठेवला. नंतर तिच्या वडिलांना विचारले असता, तुम्ही आम्हाला कर्ज द्यायला हवे होते, आम्हाला ते मिळाले, असे सांगितले. आता नोकरी नाही, नातेवाईक महिला पीएसआयला दिलेले पैसे परत मिळेनात, त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेला संगमेशचा भाऊ बसवराज हताश आहे. सध्या प्रसारमाध्यमांसमोर असलेल्या संगमेशच्या जीवाला धोका असून त्याला संरक्षण मिळायला हवे. आणि त्याने दिलेले पैसे परत करावेत अशी विनंती केली.

 

पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही अन पैसेही गेले. त्यामुळे संगमेशने आता हे प्रकरण बाहेर काढले आहे. एखादेवेळी नोकरी मिळाली असती तर त्याने या प्रकरणाची वाच्यताही केली नसती. हुशार तरुणांनी त्यांच्या नोकरीच्या आशेपोटी असे पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नये हीच आमची विनंती आहे…
विजयकुमार सारवाड, इन न्यूज-आपली मराठी, विजापूर

Tags:

FROUDE