hubali

काँग्रेसने काहीही केले तरी सत्तेत परत येणार नाही : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा

Share

लोक भाजप आणि मोदींच्या बाजूने आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही, काहीही केले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत ते सत्तेत येणार नाहीत असा दावा माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला.

हुबळी शहरातील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले की, भारत जोडो, रथयात्रा यासह काहीही केले तरी लोक काँग्रेसला भुलणार नाहीत आणि तो पक्ष सत्तेत येणार नाही. निवडणूक प्रचारासाठी येत्या 22 तारखेपासून मी राज्याचा दौरा करणार आहे.

 

बळ्ळारी विम्स रुग्णालयामधील मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु आहे. काय होते ते पाहूया असे ते म्हणाले. या प्रकरणामुळे सरकारचे नुकसान होणार का, या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले

Tags:

POLITICS