Belagavi

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुण्यात निधन

Share

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आज पुण्यात उपचारांदरम्यान निधन झाले.  पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावर गेले काही दिवस उपचार करण्यात येत होते.

तेथेच आज त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Tags: