Belagavi

संघाच्या मागे लागल्याने काँग्रेसच संपेल : भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील

Share

नेहरू, इंदिरा गांधी यांनीदेखील रा. स्व. संघाला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते जमले नाही. आता सिद्दरामय्या हात पोळून घ्यायला बसले आहेत. यात काँग्रेसच जळून नष्ट होईल असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केले.  

व्हॉईस : चड्डी पेटवण्याचा काँग्रेसच्या मोहिमेबाबत बेळगावात मंगळवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील म्हणाले, संघ ही राष्ट्रभक्त निर्माण करणारी एक सेवाभावी संघटना आहे. संघाचे स्वयंसेवक केवळ भाजपच्याच नव्हे तर काँग्रेस-जेडीएसमध्येही आहेत. उग्रप्पा, पी. जी. आर. सिंदिया हे सुद्धा संघात होते. व्यक्तिमत्व निर्माणासह राष्ट्रकार्य संघ करतो. अशा संघटनेला राजकारणात ओढणे अयोग्य आहे. दररोज चर्चेत राहण्यासाठी, स्वार्थासाठी सिद्दरामय्या काही ना काही वादग्रस्त विधाने करीत सुटले आहेत अशी टीका त्यांनी केली.

राज्यात काँग्रेस सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झाली आहे. काँग्रेस हायकमांडवर नाराज होऊन पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या चिंतन शिबिरानंतर ६९ नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. राज्यातही हीच परिस्थिती होणार आहे. सिद्धरामय्या आणि डीकेशी यांच्यातल्या शीतयुद्धामुळे अनेक नेत्यांचा आत्मविश्वास ढासळला  आहे. मुख्यमंत्री चंद्रू, ब्रिजेश काळप्पा आणि सुदर्शन काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसवरील पकड घट्ट करण्यासाठी सिद्धरामय्या रोज एक वक्तव्य करत आहेत. ते काँग्रेस पक्षाला लज्जास्पद बनवत आहेत.

राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेस हायकमांड आणि केपीसीसीमध्ये उमेदवार निवडीबाबत एकवाक्यता नाही. खर्गे जेडीएसला पाठिंबा देऊ म्हणतात तर सिद्दरामय्या त्यांच्या विरोधात आहेत अशी टीका कटील यांनी केली.

पुढच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून काँग्रेसमध्ये गोंधळ सुरु आहे. यावरून डीकेशी आणि सिद्धरामय्या यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. गटबाजी बंद करण्यासाठी चिंतन शिबीर घेतले. मात्र ते विचित्र शिबीर ठरले. तेव्हाच्या राज्यसभा निवडणुकीवरून गोंधळ निर्माण झाला. सरकार स्थापना राहू दे पण पूर्ण पक्ष बांधता आला नाही. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दोन वर्षांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. काँग्रेस संभ्रमात आहे. समाजावर याचा परिणाम होण्याचीशक्यता आहे. त्यामुळेच सिद्दरामय्या रोज एक वादग्रस्त विधान करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगली घडविण्यास चिथावणी देत आहेत असा आरोप कटील यांनी केला. बाईट

राज्यसभेच्या तीन आणि राज्य विधानपरिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शिक्षकांचा विश्वास बसला आहे. या धोरणामुळे परिवर्तन घडेल असा त्यांना विश्वास आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याची आशा आहे. त्याचबरोबर गेल्या वेळी निवडून आलेल्या  परिषद सदस्यांनी चांगले काम केल्याचा विश्वास नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केला.

एकंदर, संघाच्या मागे लागल्याने काँग्रेसच संपून जाईल असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी केले.

 

 

Tags: