बेळगावातील अल फलाह बैतुलमाल मेडिकल सोसायटीच्या वतीने एसएसएलसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.

बेळगावातील अल फलाह बैतुलमाल मेडिकल सोसायटीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करण्यात येत आहे. आज, रविवारी मुस्लिम समाजातील एसएसएलसी उत्तीर्ण गुणी विद्यार्थ्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ, अल फलाह बैतुलमाल संघटनेचे अध्यक्ष अब्दुल गफार घीवाले, अर्शद मोमीन, मुजमीन पठाण, उबैद जबीर, शकील बागलकोटी, अब्दुल खादर, प्राचार्य एस. आय. तिम्मापुर आदी उपस्थित होते. यावेळी विविध शाळातून एसएसएलसी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राजू सेठ यांनी, विध्यार्थ्यानी परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षणाला विराम नसतो. परंतु योग्य वयात चांगले शिक्षण घेऊन आयुष्याचे ध्येय गाठणे महत्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगावत विषयार्थ्यांना अनेक संधी आहेत. कुठलेही शिक्षण घेतले तरी आमचे ध्येय गाठण्यासाठी कठोर परीश्रम घेणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी विध्यार्थ्यांना केले.
सत्काराने भारावून गेलेल्या विध्यार्थ्यानी समाधान व्यक्त करून बारावीच्या परीक्षेत आणखी कठोर मेहनत घेऊन यश मिळवू असा मनोदय व्यक्त केला.
यावेळी मकसूद जमादार, खलील कोटीवाले, विध्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments