पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी निराणी ग्रुप देशातील नंबर वन ग्रुप आहे हे निश्चित आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ७२ हजार जणांना रोजगार देण्यात आला आहे. २० वर्षांच्या कालावधीत ७२ हजार रोजगार उपलब्ध करून देणे हि छोटी गोष्ट नसल्याचे मत औद्योगिकमंत्री मुरुगेश निराणी यांनी व्यक्त केले.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मुरुगेश निराणी यांनी हे मत व्यक्त केले. ग्रामीण भागात गेल्या २० वर्षांपूर्वी अत्यंत छोट्या प्रमाणात कारखाना स्थापन करण्यात आला. सध्या हा देशातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. या कारखान्यांमधून सर्वाधिक इथेनॉल उत्पादन घेतले जाते. आणि याचे युनिट बेळगावमध्ये सुरु झाले हि अभिमानाची गोष्ट आहे. केवळ बेळगावच नाही तर म्हैसूर येथेही तीन कारखाने आणि पुणे येथे एक कारखाना निराणी ग्रुप ने स्थापन केल्याचे ते म्हणाले.
नलवाडी कृष्णराज वडेयार यांनी या भागातील जनतेच्या सोयीसाठी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या जिल्ह्यात आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू तयार करण्याच्या उद्देशाने १५० कारखाने उभे केले हि बाब आदर्शवत आहे. १५० वर्षांपूर्वी आपल्याला मिळालेल्या या धड्यामुळे आपल्याला एक आदर्श मिळाला. आगामी काळात सिंचन, शिक्षण, बँकिंग क्षेत्रासह सर्व क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी आपण काम करू, असेहि निराणी म्हणाले. ()
जितके रोजगार मिळवून देणे गरजेचे होते तितके रोजगार मिळवून देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावर प्रत्त्युत्तर देताना निराणी म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमी फॉर्म आणि एफडीआय यांच्या त्रैमासिक सर्व्हेनुसार कर्नाटक राहय संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशात आपला वाटा ४२ टक्के आहे. उर्वरित ५८ टक्के हा ३० राज्यांचा वाटा आहे. यावर काँग्रेसचे काय मत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ()
आरएसएस संदर्भात काँग्रेस कडून होणाऱ्या टीका टिप्पण्यांविरोधात प्रतिक्रिया देताना मुरुगेश निराणी म्हणाले, आर एस एस संघटना उभारण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग करण्यात आला आहे. रात्रंदिवस देशासाठी कार्यरत राहणारी हि संस्था आहे. या संस्थेतील कोणीही फाईव्ह स्टार मध्ये राहत नाही किंवा विमानातून फिरत नाही. या संस्थेसंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नसल्याचे मुरुगेश निराणी म्हणाले. ()
दावोस संदर्भात प्रतिक्रिया देताना मुरुगेश निराणी म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह आपण आणि अधिकारी दावोस मध्ये उपस्थित राहिलो. यावेळी ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला असून ८० हजार कोटी रुपयांच्या वाढीव गुंतवणुकीसंदर्भात दावोस परिषदेत चर्चा झाली. जागतिक गुंतवणूकदारांची परिषद येत्या २ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू मध्ये आयोजित करण्यात आली असून याचप्रमाणे वित्तआयोग, औद्योगिक क्षेत्र, आयटीबीपी मंत्री हि या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुरुगेश निरांनी यांनी सांगितले. ()
या भागात नॅशनल लॉ कॉलेज उभारण्याची मागणी वकिलांनी केली आहे. हि मागणी योग्य असून ज्याप्रमाणे इंजिनियरिंग महाविद्यालय अपग्रेड करून आयटी करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे लॉ कॉलेजदेखील अपग्रेड करण्यात येतील. यासंदर्भात चिंतन करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुरुगेश निराणी यांनी दिली.


Recent Comments