Belagavi

आ. अभय पाटील यांचा सिटी राऊंड; पावसाने झालेल्या समस्यांचा घेतला आढावा

Share

बेळगावात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहेपावसाने सखल भागात अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. बेळगाव दक्षिणचे . अभय पाटील यांनी आज सकाळी अशा भागांना भेट देऊन पाहणी केली. 

होय, बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अभय पाटील यांनी आज, शुक्रवारी पहाटे ४.३० वाजल्यापासूनच सिटी राऊंड सुरु करून पावसाने नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. अनेक घरांत पावसाचे पाणी घुसून रहिवाशांना राहणे कठीण झाले आहे. त्यांची आ. पाटील यांनी विचारपूस केली.

या संदर्भात माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, गेल्या वर्षी करिअप्पा कॉलनी, एसटी कॉलनी, मराठा कॉलनी, गांधी कॉलनी, शास्त्री नगर, जककेरी होंडा, साई नेकार कॉलनी, आणि महाद्वार रोड परिसरात फिरून पाहणी केली आहे. महाद्वार रोड पहिला क्रॉस येथे थोडे पाणी साचले आहे. तसेच साई नेकार कॉलनीत तेथील तळ्याचे थोडे पाणी रस्त्यावर साचून सुमारे ८ घरांची वाट बंद झाली आहे. हे वगळता अन्यत्र फारशी गंभीर परिस्थिती नाही असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक नंदू मिरजकर, राजू भातकांडे, स्थानिक नेते आनंद चव्हाण, जयंत जाधव, भागवत, नितीन गोडसे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: