Banglore

पाणी शिरलेल्या घरांसाठी २५ हजार रुपये भरपाई

Share

बेंगळुरू येथे गेल्या दोन दिवसांपासून होत अस्लेल्यामुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. पाणी शिरलेल्या अशा नुकसानग्रस्तांना २५००० रुपये भरपाई देण्याचा निर्धार करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई य आणि दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळूरमधील राजराजेश्वर नगर येथील परिसरात भेट दिली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुरामुळे जीव गमवाव्या लागलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. बेंगळुरू मधील काही भागात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. राजाकालव्याजवळील परिसरात अनेक घरात पाणी शिरले आहे. कालव्यामधील पाणी वाहून न जात एकाच ठिकाणी साचण्याचाप्रकार घडत आहे. यामुळे पाणी वाहणाऱ्या भागातील अडथळे दूर करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी राजकालव्यासंदर्भातील कामकाजाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, सदर कालव्याचे कामकाज अपूर्ण राहिल्याने पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे. ८०० किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या वर्षात ४०० किलोमीटर पर्यंतचे कामकाज झाले असून उर्वरित कामकाज या वर्षात पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी उल्लाळ् येथे झालेल्या दोन व्यक्तींच्या मृत्यूसंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, पाणी विभागाचे काम याठिकाणी सुरु होते. यावेळी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ()

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राजकालव्याच्या परिसरात तलाव, गटारी, गॅस लाईन, पाणी पाईपलाईन, टेलिकॉम केबल, वीजजोडणी अशी अनेक कामे करण्यात येत आहेत. यासाठी टास्क फोर्स नेमण्यात आले असून हे सर्व कामकाज संपल्यानंतर रस्ते निर्मिती होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

Tags: