जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून शोभायात्रेने करण्यात आली.

जालगार गल्ली येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवणं गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. या शोभायात्रेत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. 
महिला मंडळाच्या रौप्य महोत्सवी कायर्यक्रमाबाबत कालिका दैवंद्य महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरुवात दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते झाली. रौप्यमहोत्सवानिमित्त मेहेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा यासह अनेक स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी खासदार मंगला अंगडी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शहरात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या महिला मंडळाने आजतागायत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले असून रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमदारांनी मोठे सहकार्य दिले असून या महिला मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, कुटुंबातील सदस्य तसेच इतर महिला मान्यवरांनी मोठा सहभाग घेतला होता.


Recent Comments