आपल्या चुका झाकण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायदा जारी करण्यात येत आहे, राज्य सरकारच्या या निर्णयाचा आपण निषेध करत असल्याची प्रतिक्रिया विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केली आहे.

: बेळगाव काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार हे अपयशी सरकार आहे. अपूर्ण विकासकामे, पीएसआय परीक्षा घोटाळा, ४० टक्के कमिशन आणि यातून कंत्राटदाराने केलेली आत्महत्या या साऱ्या गोष्टी कर्नाटक सरकारचे अपयशाचे उदाहरण आहे. राज्यात जातीयवाद पसरवून राज्यातील शांतता, सौहार्दपूर्ण वातावरण बिघडत असून दिवसागणिक भाजपमधील नेते जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चन्नराज हट्टीहोळी यांनी केला.
धर्मांतर विरोधी कायदा संमत करण्यासाठी बेळगावमध्ये झालेल्या अधिवेशनात निर्णय घेण्यात आला. मात्र याठिकाणी देखील भाजप सरकार अपयशी ठरले. सरकार घटनेच्या विरोधात निर्णय घेऊन आपले अपयश अशा माध्यमातून झाकण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही हट्टीहोळी यांनी केला. ()
धर्मांतर विरोधी कायद्याला आपला विरोध असून यासंदर्भात परिषदेचे विरोधी पक्ष नेते बी के हरिप्रसाद यांच्याशी आपली दूरध्वनीवरून चर्चा झाली असल्याचे हट्टीहोळी म्हणाले. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण बेंगळुरू येथे बैठकीसाठी जाणार असल्याची माहिती चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.
भाजप सरकारने धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी विरोध दर्शविला असून सरकारच्या या निर्णयाचा आपण निषेध करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बेळगाव काँग्रेस भवन येथे दिली आहे.


Recent Comments