कलबुर्गी येथे जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत जगद्गुरू रेणुकाचार्यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वामीजी आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रेणुकाचार्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
याचप्रमाणे उपस्थित स्वामींचा व्यासपीठावर शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ज्या ज्या वेळी वीरशैव धर्माला आशीर्वादाची गरज असते त्या त्या वेळी परमपूज्य व्यक्तींकडून आपल्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळत आले आहे. याचप्रमाणे रेणुकाचार्यांनी मानव धर्माचा जयजयकार करत उदात्त ध्येयवाद समाजाला दिला. जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत त्याचप्रमाणे जगणे हे देखील अटळ आहे. यासाठी आपल्याला देवाची नाही तर गुरूंची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतात. आपल्याला देखील अनेक स्वामींच्या आशीर्वादाची साथ लाभली असून अनेकांचे मार्गदर्शन देखील लाभले आहे. आपण यासंदर्भात पुण्यवंत असून योग्य तत्व, सिद्धांत आणि आचार विचार जीवनात पाळावे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. ()
आपल्या वैयक्तिक जीवनासह सामाजिक आयुष्य जगतानाही अध्यात्म आणि गुरूंचे महत्व किती आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपले विचार व्यक्त केले.


Recent Comments