बेळगावमधील आंबेडकर गार्डन येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी भाजपसह मंत्री ईश्वरप्पांवर देखील टीका केली आहे.

ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर आंदोलन छेडण्यात येणार आहे. इतरांच्या बाबतीत एफआयआर दाखल होण्यापूर्वीच राजीनामा विचारण्यात येतो. आता मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे, संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांनी आरोप देखील केला आहे, ईश्वरप्पा यांना अटक करण्यासाठी इतके पुरेसे नाही का? असा सवाल जारकीहोळी यांनी उपस्थित केला.
भाजप हा मोठा पक्ष आहे.प्रामाणिक पक्ष असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. तर मग आता संतोष पाटील प्रकरणी भाजप किती प्रामाणिक राहते हे आता पाहायचे आहे. डी के रवी, हर्ष, या प्रकरणी भाजपने काय केले आहे हे सर्वश्रुत आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा वापर केवळ ‘युज अँड थ्रो’ हि पॉलिसी वापरून करते, आणि संतोष पाटील यांच्या संदर्भात देखील हेच घडले आहे, असा आरोप त्यांनी केला.
संतोष पाटील यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस नेत्यांनी तगादा लावला आहे. यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीकेचा भडीमार केला आहे. आता संतोष पाटील प्रकरणी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपणार, हे मात्र नक्की आहे.


Recent Comments