काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात म्हादई आंदोलकांना तुरुंगात डांबून मारहाण केली होती. त्यांना आता या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.

बेळगावात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, म्हादईप्रश्नी परवाच मुख्यमंत्री व मी दिल्लीला जाऊन केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा केली आहे. म्हादई योजनेच्या कामात आम्हाला स्वायत्तता देण्याची मागणी केली आहे. राज्याच्या फ्री फिजीबिलीटी रिपोर्टला मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस सरकार असताना म्हादई योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या 780 शेतकऱ्यांना त्यांनी घरात घुसून बाहेर काढून तुरुंगात डांबून बेदम मारहाण केली होती. महिलांच्या अंगावरील कपडेही फाडून टाकले होते. त्यामुळे काँग्रेसला या प्रश्नी आंदोलन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. म्हादई, मेकेदाटू, कृष्णा पाणी तंटे आमच्या सरकारच्या काळातच सोडविणार आहोत असे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.
एकंदर म्हादई योजना सरकार बोलल्याप्रमाणे राबविणार का ते ही केवळ एक आश्वासनच ठरणार हे पहावे लागेल.


Recent Comments