नागरी हक्क अंमलबजावणी संचालनायलचे डीजीपी डॉ. रवींद्रनाथ यांनी बेळगावमधील ज्योतीनगर येथील परिसरात भेट देऊन डोंबारी समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरातील डोंबारी समाजाच्या विकासासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा आदेशही डीजीपींनी दिला आहे.

गणेशपूर परिसराजवळ असलेला ज्योती नगर परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंबारी समाजाची वस्ती आहे. या परिसराची पाहणी आज नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या डीजीपींनी केली असून येथील मूलभूत सुविधा आणि इतर समस्यांसंदर्भात डोंबारी समाजातील नागरिकांशी संवाद साधला. अचानकपणे भेटीचा दौरा आखून या परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन डीजीपी डॉ. रवींद्रनाथ यांनी पाहणी केली. या परिसरात असलेल्या पाण्याच्या, आरोग्याच्या तसेच इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासंदर्भात येथील नागरिकांनी विनंती केली.
या परिसरात दिवसातून दोन वेळा पाणी पुरविण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या भागाच्या संपूर्ण विकासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून या भागातील समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील मंत्री, स्थानिक आमदार आणि खासदारांनी परिश्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले असून या भागात नोडल अधिकारी म्हणून सीआरसीएल एसपी अनिलकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी दलित नेते मल्लेश चौगुला यांनी सांगितले कि, डॉ. रवींद्रनाथ हे एक कर्त्यव्यदक्ष अधिकारी आहेत. या भागाला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधणारे हे पहिले अधिकारी आहेत. नागरिकांच्या भल्यासाठी नेहमीच ते कर्तव्य बजावत असतात. याचप्रमाणे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पण घेतला असून यासाठी आपल्या साऱ्यांचे सहकार्य त्यांच्यासोबत असल्याचे मल्लेश चौगुले म्हणाले.
अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या कार्याचा ठसा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उठवत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आणि मागासलेला हा परिसर डीजीपी रवींद्रनाथ यांच्या प्रयत्नातून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची आशा येथील नागरिकांना दिसत आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डीजीपींनी मंत्री, आमदार आणि खासदारांनाही आवाहन केले शिवाय याठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत लवकरात लवकर हा परिसर विकसित करण्याची सूचना केली आहे. ज्योतीनगर परिसरातील नागरिकांना डीजीपींच्या माध्यमातून आपल्या विकासाच्या आशेचा किरण नक्कीच दिसला असेल, यात शंका नाही.


Recent Comments