खानापूर तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील २०२१-२२ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत ४००७४ निर्धारित उद्दिष्ट्य साध्य कारण्यापैकी १५८.८२ टक्के उद्दिष्ट्य साध्य केले असून यासाठी तालुक्याला प्रथम स्थान मिळाले आहे, अशी माहिती ग्राम पंचायत विकास अधिकारी बलराज भजंत्री यांनी दिली आहे.

ग्राम पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. सरत्या आर्थिक वर्षात लोंढा ग्राम पंचायतीने २१४३९ पैकी एकूण ३५६६५ टक्के उद्दिष्ट्य साध्य केले आहे. हा भाग अत्यंत असुरक्षित घोषित करण्यात आला असून नरेगा योजने अंतर्गत तलाव आणि कालवे खोदले जात आहेत. जंगलात नवीन तलाव, कृषी तलाव, धान्य कोठार, खुल्या विहिरी, शेतकऱ्यांची शेतं, गुरे-मेंढ्या उतरवणे, मलनिस्सारण व सांडपाणी, मृद व आर्द्रता संवर्धनाची कामे, सामाजिक वनीकरण, वनीकरण खंदक (CPT) ही कामे केली जात आहेत. या वर्षी गावातील मोलमजुरी करणाऱ्या एकूण ६७ कुटुंबांची नोंदणी झाली आहे. तर एकूण ८२२ जणांची नवनिंदनी करण्यात आली असल्याचं येते म्हणाले. गावात नरेगा प्रकल्प राबविण्यासाठी ग्रा.पं.चे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याची माहिती पंचायत विकास अधिकारी बलराज भजंत्री यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शेवरीन डयाज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, राज्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन म्हणून लोंढा जंक्शनचे नाव घेतले जाते. परंतु येथील उद्योग आता बंद पडले असून लॉकडाऊन मुळेरेल्वे संचार बंद झाल्याकारणाने येथील नागरिकांचे व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. येथील नागरिकांसाठी नरेगा अंतर्गत रोजगार देण्यात आला असून यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो मोलमजुरी करणाऱ्या कामगारांनी जनजगृतीचे काम केले आहे. यामधील अनेक कामगार पदवी, पदव्युत्तर, इंजिनियरिंग पदवी प्राप्त असलेले आहेत, आणि हे सर्वजण आपल्याला अनुरूप असे कार्य करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.()
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संदीप सोज, निळकंठ उसपकर, नवाज जुनेदी, रेशमा पठाण, कुमार पाटील, उर्मिला मिराशी, संजना पालेकर, वैशाली कांबळे, विलास मांगलेकर, शिवानंद खोत, शांता खंडुरे, यशवंत गावडे, यल्लाप्पा नाईक, रफिक कित्तूर आदी उपस्थित होते.


Recent Comments