अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सर्व योजनांना निधी पुरवण्यास सरकार वचनबद्ध आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विधानसभेत सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, 2021-22चे बाहेर 5 हजार कोटींनी कमी होते. मात्र 2022-23चे बजेट 2 लाख 65 हजार 720 कोटी रुपयांचे आहे. म्हणजेच यंदाच्या बजेटमध्ये 7.9%नी वाढ झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार कमी करावा अशी सूचना आमच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र तसे केल्यास त्याचा परिणाम थेट विकासावर होईल म्हणून तसे केले नाही. काहीही करून निधी उपलब्ध करायचा, केंद्राकडे आमच्या वाट्याची बाकी रक्कम आणायची असे ठरवून शेकडा 7.9ने बजेटचा आकार वाढविला आहे.
यात 2 लाख 4 हजार 587 कोटी रुपये राजस्व खर्च, 46,955 कोटी रुपये भांडवली खर्च, कर्जफेडीसाठी 14129 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जनकल्याणाच्या अनेक योजना आम्ही जाहीर केल्या आहेत. कृषी, उत्पादन, सेवा क्षेत्र आर्थिक विकासासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. यासोबतच सामाजिक गुंतवणूकही केली आहे. ज्या-ज्या योजनांना, समुदायांना निधी देण्याची घोषणा केली आहे त्या-त्या योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगत आहे. त्यामुळे सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी यावेळी केले. बाईट


Recent Comments