Belagavi

‘कृष्णा’ योजना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावा : आम. यत्नाळ

Share

कृष्णा नदीवरील योजना हि राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करावी अशी मागणी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, शिवानंद पाटील यासह अनेकांनी सरकार दरबारी केली आहे .

सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून यासंदर्भात आम. यत्नाळ बोलताना म्हणाले, कर्नाटकातील ७२ टक्के भाग कृष्णा खोर्यात येतो. हि योजना संपूर्ण होण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज आहे. हि योजना पूर्ण होण्यासाठी शेकडो वर्षे जातो. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री काळात नर्मदा नदी योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय योजनेची घोषणा झाली त्याचप्रमाणे कृष्णा नदी योजनाही राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावी, असा आग्रह यत्नाळांसहित इतर नेत्यांनी केला.

यत्नाळ पुढे म्हणाले, गोविंद कारजोळ हे आपल्याच जिल्ह्यातील असून ते सध्या पाटबंधारे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. उत्तर कर्नाटकातील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या योजनेसाठी केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी करावी, हि योजना राष्ट्रीय प्रकल्प बनविण्यासाठी प्रयत्न करावेत असा आग्रह यावेळी करण्यात आला. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी प्रत्येक सत्ताधारी हीच कथा पुढे चालवतात. आता गोविंद कारजोळ यांनी यासंदर्भात ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यानंतर काँग्रेस पक्षाचे आमदार शिवानंद पाटील यांनी आपला मुद्दा उपस्थित करताना सांगितले, पाणी वाटपामध्ये विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे. याची दुरुस्ती कशी करावी हे आपण सुचवावे असा आग्रह सभागृहाला करण्यात आला. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात खुलासा द्यावा, असा आग्रह त्यांनी केला. यानंतर मंत्री गोविंद कारजोळ यांनी माहिती दिली.

यानंतर बागलकोट चे आमदार वीराण्णा चरंतीमठ बोलताना म्हणाले, लाखो एकर जमीन पावसामुळे पाण्याखाली गेली आहे. उर्वरित जमिनीला पाटबंधारे विभागाकडून सहायय करण्याचा आग्रह त्यांनी केला. यासह रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड बोलताना म्हणाले, श्री वीरभद्रेश्वर लघुपाटबंधारे योजनेसाठी २०१७ मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. २०१९ मध्ये हे कामकाज पूर्ण होणे गरजेचे होते. २०१७-१८ या सालात मुख्य कालव्यापासून वेगळा कालवा करण्यात आला. परंतु मुख्य कालवा अद्याप पूर्ण करण्यात आला नाही. केईबी विभागाचेही काम अर्धवट स्थितीत आहे. या कामकाजाची निविदा इतरांना देऊन सदर कामकाज त्वरित पूर्ण करून घ्यावे, असा आग्रह त्यांनी केला.

यावेळी बुदिहाळ मतदार संघाचे आमदार ए एस पाटील नडहळ्ळी यांनी बोलताना सांगितले, हुनगुंद येथील काही गावांमध्ये अजूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. मुद्देबिहाळ परिसरातील १० गावांचे पुनर्वसन करण्यासाठी १२० कोटी रुपयांची क्रिया योजना तयार करण्यात आली असून ४० कोटी रुपये येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना देण्यात आले होते. उर्वरित अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

उपस्थित सभासदांच्या सर्व सूचना आणि मागण्या ऐकून मंत्री गोविंद कारजोळ यांनी उत्तर देताना सांगितले कि, कृष्णा वरील ३ ऱ्या योजनेसाठी २०१७ मध्ये ५११४८ कोटी रुपयांचे एस्टिमेशन काढण्यात आले होते. आता यासाठी वाढीव १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय प्रकल्पासाठी २ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राची गरज आहे. आम्ही नियमाच्या बाजूने कार्यरत असून आंतरराज्य दलविवादासाठी हे काम रखडले असल्याचे गोविंद कारजोळ म्हणाले. ()

Tags: