हिंदू देवस्थानात मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यापार करू न देणे हा भाजपचा छुपा अजेंडा आहे, तो आता ते जारी करत आहेत असा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केला.

बेळगावातील काँग्रेस भवनात गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या २ महिन्यांत शिमोगा हत्या, हिजाब प्रकरणावरून भाजपने रान उठवले. आता हा नवा अजेंडा ते राबवित आहेत. हजारो वर्षांपासून या देशात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे असा अजेंडा राबविणे दुर्दैवी आहे असे ते म्हणाले.
यावेळी जारकीहोळी कुटुंबाला मंत्रिपद मिळेल का या पत्रकारांच्या प्रश्नावर, भाजपशी संबंधित प्रश्न भाजपलाच विचारायला हवेत. कुटुंबाचा संबंध असता तर लखन जारकीहोळी पहिल्या पसंतीच्याच मतांनी पहिल्याच फेरीत निवडून आले असते. कुटुंब वेगळे अन पक्ष वेगळा असे त्यांनी सांगितले. राज्यात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता फेटाळत येत नसल्याचा संकेत देताना गुजरातसोबत राज्यात निवडणूक होऊ शकेल. भाजपने याबाबत सर्वेक्षण केले आहेच. त्यामुळे येत्या ६ महिन्यात किंवा ६ महिने संपताच राज्यात निवडणूक शक्य आहे. निवडणूक केंव्हाही झाली तरी जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, कोणी कुठून निवडणूक लढवावी हे ठरविण्यासाठी अजून वेळ आहे असे त्यांनी सांगितले.
शिक्षक मतदार संघातील एमएलसी निवडणुकीबाबत या. सतीश जारकीहोळी म्हणाले, किरण साधुनवर यांच्यासह आणखी दोघांनी उमेदवारी मागितली आहे. अंतिमतः कोणाला मिळते हे पहावे लागेल. अजून उमेदवारी निश्चित झालेली नाही. कोणत्या जिल्ह्याला मिळते बघावे लागेल. विजापूर, बागलकोट आणि बेळगाव या ३ जिल्ह्यांच्या समीकरणावर आधारित उमेदवारी द्यावी लागते. शिक्षक मतदारसंघातून बन्नूर, बेळगली आणि प्रकाश हुक्केरी यांनी उमेदवारी मागितली आहे. पदवीधर मतदार संघातून किरण साधुनवर यांच्यासह अथणीच्या ऍड. संख यानिउमेद्वारी मागितली आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर भाजप हिंदू-मुस्लिमांच्या द्वेषाची बीजे रोवत असल्याचा आरोप आ. सतीश जारकीहोळी यांनी यावेळी केला.


Recent Comments