Belagavi

ग्रामवास्तव्य अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचा मेळवाडला मुक्काम

Share

जनतेच्या समस्या ऐकून आणि जाणून घेण्यासाठी सरकारने जनतेच्या दारापर्यंत जाण्याचा नवा उपक्रम सुरु केला असून गावोगावी जाऊन तेथे ग्रामवास्तव्य करणाऱ्या मोहिमेत जिल्हाधिकारी महांतेश महांतेश हिरेमठ यांनी मेळवाड ग्रामस्थांशी संवाद साधला .

शनिवारी मेळवाड ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील ग्रामस्थांच्या समस्यांविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. मेळवाड गावातील लक्ष्मी देवस्थानात पूजा करून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसंचार सुरु केला. झान्झपथकाचा माध्यमातून महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणूक काढत महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान बिरदेव देवस्थानात दर्शन घेऊन पुढे जिल्हाधिकारी मार्गस्थ झाले. यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्यासह अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी हेदेखील उपस्थित होते.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. २०१९ साली आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. दिव्यांग असलेला प्रज्वल रामू बालिकाई यांच्या पालकांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी कृष्ण नदीला आलेल्या पुरानंतर झालेल्या नुकसानीची माहिती देऊन पुनर्वसन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्या समस्यांवर तोडगा काढण्याची गवाही दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, उपविभागाधिकारी संतोष कामगौडा, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, आहार विभागाचे सहसंचालक सी बी कोडली, तहसीलदार आर आर बुर्ली, तालुका आरोग्याधिकारी बसगौडा कागे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: